सर्वत्र जागतिक तापमान वाढीची हाकाटी ऐकू येते, या वर एक जालीम उपाय सुचला आहे। समजा तुमच्या घराला पत्र्याचे छप्पर आहे आणि ते अतोनात तापते (तुम्ही जलगांव, जालना आशा ठिकाणी राहता आहात ) तर किती तापेल? आता वैद्न्यानिकांनी असे उपकरण करायचे की ते त्या पत्र्याला जोडायचे, त्यातून एक तार खाली आणायची त्या तारेतून सर्व उष्णता तारेत खेचून घेतली जाईल , त्या तारेचे दुसरे टोक लोखंडाच्या तव्याला जोडायचे म्हणजे पत्रा गरम राहाणार नाही आणि तव्याचा उपयोग हॉट प्लेट सारखा करायचा इंधन बचत।
याक तारेचे आणखी एक टोक फ्रीज किंवा एसी ला जोडायचे, मधे आवश्यक यंत्रणा वापरायची त्यामुले ही दोन्ही यंत्रे चालू लागतील वीज बचत होईल व गारवा मिळेल
आणखी एक टोक बेटरीला जोडून वीज निर्माण करायची।
ही झाली पत्रा गार करून ऊर्जा जमा करायची युक्ती याखेरीज विशिष्ट धातूच्या तारा वापरून अति भव्य जाली (नेट) करून त्यात वातावरणातील उष्णता (ऊर्जा) जमा करायची आणि अन्य साधने वापरून त्यापासून वाफ बनवून त्यावरून औष्णिक वीज करायची यामुले विजेचा महापूर तर येईलच पण झाडे, सर्पण वाचेल व् प्रदूषण ही होणार नाही
Wednesday, June 9, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment